शेतकरी हितार्थ जनआंदोलन समिती तर्फे भव्य मशाल मोर्चा धडकणार तहसिलवर
शेतकरी हितार्थ जनआंदोलन समिती तर्फे भव्य मशाल मोर्चा धडकणार तहसीलवर
(त्रस्तशेतकऱ्यांसह,नागरीकांचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे वेधले घजाणार लक्ष)
महागाव (सचिन उबाळे)
महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे व निराधार नागरीकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने शासनाचे लक्ष वेधून जागे करण्यासाठी सर्व मागण्या मंजुर करण्यात याव्या या करिता जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन शेतकरी,नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले आहे.
महागांव तालुका हा बरेच वर्षापासून प्रभारावर आहे. त्यातील मुख्य तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, विज वितरण कंपनी, भुमी अभिलेख, व इतर बरीचशी कार्यालयाचे अधिकारी हे तेथीलच सिनिअर व्यक्तीकडे प्रभार असल्याने त्या कार्यालयातील कर्मचारी यांना नगद पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही त्यामुळे तात्काळ कायम स्वरुपी अधिकारी नियुक्त करण्यात यावा.अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे व व्यापाऱ्यांच्या गोडावून मधील मालाचे प्रचंड लाखो रुपयाचे आर्थीक नुकसानीचा पंचनामा होवून बहुतःश शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मोबदला आजपर्यंत मिळाला नाही, पिक विमा कंपनीने गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही. घरपडीचा मोबदला मिळाला नाही
अवकाळी पावसामुळे हरभऱ्याची दुबार पेरणीची वेळ बऱ्याच शेतकऱ्यावर आली त्या शेतकऱ्यांना मोबदला देवून मदत करावी,अपंग, विधवा, निराधार, दिव्यांग लाभार्थ्यांना जाती निहाय न वाटप करता सर्वांचे मानधन एकाच वेळी वितरीत करण्यात यावे. व प्रत्येक गावा-गावात वरील लाभार्थ्यांना सि.एस.पी. व्दारे वाटप करण्यात यावे. त्यामुळे जाण्यायेण्याचा वेळ, खर्च,दलाला पासून फसवणूक वाचेल, महागांव- फुलसावंगी रोडची निकृष्ठ बांधकामाची पाहाणी करुन शासनाचे 40 कोटी रुपये मातीत गेले. त्या दोषी असलेल्या पुसद व महागाव च्या अधिकाऱ्याकडून ते पुर्ण रक्कम वसूल करण्यात यावी, महागांव ग्रामिण रुग्णालयाची पद भरती गेल्या 7 वर्षापासून प्रलंबीत आहे. ती पदे तात्काळ भरुन रुग्णालय चालु करुन तालुक्यातील गोर गरीब रुग्णाचे यवतमाळ रेफर पासून प्राण वाचविण्यात यावे, विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे महागांव तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून विजेच्या लपंडावाने शेतकरी व प्रत्येक गावातील जनता अत्यंत त्रस्त आहे. या मध्ये नादुरुस्त जुनीच डि. पी लावून शेतकन्यांचे समाधान केल्या जाते त्यासाठी प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांने खाजगी व्यक्ती मार्फत प्रचंड प्रमाणात नगद पैसे वसूली करण्यात येत आहे. त्याची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी व सक्षम अधिकारी तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. व प्रत्येक 10 शेतकऱ्यामागे 100 के.व्ही. चे रोहित्र (डि.पी.) तात्काळ देण्यात यावी. शहरातील 11 के.व्ही वाहिन्या स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात यावी,महागांव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा घोळ व प्रोत्साहनपर अनुदान 50,000/- रु. आजपर्यत खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळत नाही. तो घोळ तात्काळ दुरुस्त करावा,महागांव तालुक्यात ज्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतरही रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्याला कायम सेवेतून कार्यमुक्त करण्यात यावे, अवैध दारु गाळपाने प्रत्येक गावात हैदोस घातल्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहे लहान मुलांना दारुचे व्यसन लागत आहे. त्याला थांबविण्यासाठी मोठी कार्यवाही करुन अनेक वेळा महागांव पोलीस स्टेशनला निवेदन देणाऱ्या महिलांना न्याय देण्यात यावा. या मागण्यांसाठी विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने १३फेब्रुवारी २०२४रोज शुक्रवार ला महागाव तहसिल कार्यालयावर भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन शेतकरी,निराधार,नागरिकांनी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे अहवान जन आंदोलन आधार संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले आहे.