ईतरसामाजिक

आसान्या फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन नागपूर येथे साजरा

आसान्या फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन नागपूरात उत्साहात साजरा

ब्युरो रिपोर्ट नागपूर, दि. 21 जून –

आर्थिक व सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या आसान्या फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, कामठी रोड नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला . या कार्यक्रमास राज्यातील व देशातील आसान्या फाउंडेशन सोबत कार्यरत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून मा. विजय बी. वाघमारे (IAS), प्रधान सचिव – आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी फक्त प्रशासकीय सेवा म्हणजेच सर्व काही नसून उद्योजक बना असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवाहन केले.
विशेष अतिथी म्हणून मा उदय भारती डीआरएम (पी) उपस्थित होते , बिहार राज्यातील एका खेडेगावात शिकून १० वीत ५० % मार्क्स मिळून सुद्धा पुढे सिविल सर्विस पास झालो त्यामुळे तुम्ही सर्व यशस्वी होऊ शकता असे सांगितले ,

कार्यक्रमाचचे अध्यक्षस्थान भूषवत डॉ . किशोर मानकर एस. मानकर, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर ह्यांनी समाजातील श्रीमंत लोकांनी थोडाफार पैसा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान द्यावा असे मत व्यक्त केले .

कार्यक्रमाला सन्मानिय अतिथी म्हणून
मा. मुकुल पाटील (IRS) – अतिरिक्त आयुक्त जीएसटी, नागपूर, डॉ सिद्धार्थ गायकवाड उपायुक्त समाजकल्याण
यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात केंद्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारे तनिष्क गेडाम, सावी बुलकुंडे ह्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच महाराष्ट्र वन सेवेतून भारतीय वन सेवेत पदोन्नती झालेले श्रीमती गीता नन्नवारे, श्रीमती दिपाली तलमले, श्री प्रितमसिंग कोडापे ह्यांचा सत्कार करण्यात आला. श्री अनुप कुमार , नालंदा अकादमी वर्धा व श्री राजू केंद्रे एकलव्य इंडिया फाउंडेशन ह्यांनी देश विदेशात ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी ह्याबद्दल मार्गदर्शन केले . या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ मनोहर कुंभारे, तर सह अध्यक्ष प्रा विलास तेलगोटे होते आसन्या फाउंडेशन राबवित असलेल्या मुलं मुलींचे हॉस्टल , वृधाश्रम , एनिमल चैरिटेबल क्लिनिक इत्यादी उपक्रमासाठो श्री प्रकाश शेंडे , गोपीचंद कांबळे , राजेंद्र दुपारे, ताराचंद गणवीर , डॉ सुशील वानखेडे ह्यांनी ३ लाखाचा निधी दान केला . महिला सबलीकरण ह्या सेशन मधे डॉ प्रज्ञा बागडे, प्राचार्य, गीता नन्नावरे भा व से, संगीता पवार , दारूबंदी संघटना, डॉ नेहा गोडघाटे , रेखा भवरे ह्यांनी विचार मांडले . दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाचे संचालन , डॉ सुजाता दमके, तेजस्विनी गवई, कनिष्का गोंदाने ह्यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजेंद्र मेश्राम , मोहन गजभिये , प्रा विलास टेलगोटे, रितेश गोंदाणे , राहुल साळवे, किशोर बनसोड , नितेश मेश्राम, अक्षय घोनमोडे, मृणालिनी दहीकर, अमित मेश्राम , अमित चहांडे , सम्राट कांबळे , राजन तलमले , मोनिका निंबेकर व आनंद देसाई व इतर कार्यकर्त्यांचा पुढाकाराने कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close