मौल्यवान वस्तू परत करणाऱ्या दोन्ही युवकांचे सर्वत्र कौतुक !
मौल्यवान वस्तू परत करणाऱ्या दोन्ही युवकांचे सर्वत्र कौतुक !
विशेष प्रतिनिधी ( प्रसाद शिंदे):-
महागाव तालुक्यातील टेंभी ते हिवरा संगम हा रस्ता थेट माहूर रोडला जोडला आहे.म्हणून चाकरमानी या रस्त्याचा उपयोग शॉर्टकट म्हणून अनेक वाहनधारक या रस्त्यावरून प्रवास करत असतात अनेक गावातील प्रवाशांचा प्रवास याच रस्त्यावरती असतो आपल्या कामानिमित्त जात असताना टेंभी येथील अंकुश कांबळे व दर्शन कांबळे या युवकांना मौल्यवान सोन्याचे दागिने १२ ग्राम अंदाजे किंमत ९०००० हजार रुपये यामध्ये मनी मंगळसूत्र व कानातील झुमके सदर युवकांना दि. ८ एप्रिलला सापडले. ते सोन्याचे व्यापारी असलेले संतोष मरकटे यांच्याकडून अनावधानाने रोडवर सोने पडले ते सोने गावातील दोन्ही युवकांनी माणुसकी व प्रामाणिकपणा जिवंत ठेवून सोनबा कांबळे या सामाजिक कार्यकर्त्याच्या यांच्या माध्यमातून येथील टेंभी ग्रामपंचायत कार्यालयाकडे सुपूर्द केले. ज्या कोण्या व्यक्तीचे हे सोने हरवले असेल त्यांना ते परत करा या प्रामाणिक विचाराने त्यांनी मन मोठे केले ज्या कोण्या व्यक्तीचे सोने हरवले असेल त्यांनी ग्रामपंचायत कडून घेऊन जावे याकरिता चर्चा झाली तेव्हा संतोष मरकटे यांना कळाले की आपले सोने टेंभी येथील युवकांना सापडले आहे आणि त्यांनी ग्रामपंचायतला सुपूर्द केले आहे. हे मूल्यवान वस्तू त्यांचीच आहे का याची सर्व शहानिशा करून त्यांना हे मौल्यवान वस्तू काल दि. ९ एप्रिलला परत करण्यात आल्या.त्यामुळे टेंभी येथील युवकांचा प्रामाणिकपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे. संतोष मरकटे यांना त्यांच्या युवकांना मिळालेल्या त्या मूल्यवान वस्तू परत करतेवेळी टेंभी गावचे उपक्रमशील, सामाजिक बांधिलकी जपणारे सरपंच अमोल चिकणे, सोनबा कांबळे, दर्शन कांबळे अंकुश कांबळे, गणेशराव सुकळकर, अवधूतराव सुकळकर, हरी कहूळकर, पांडुरंग शेवाळकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. मौल्यवान वस्तू परत करणाऱ्या दोन्ही युवकांचे सरपंच अमोल चिकने सह गावकऱ्यांनी कौतुक केले..!!