महागाव पोलीस ठाण्यातील वादग्रस्त बिट जमादाराची उचल
बांगडी
प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नाला आले यश
महागाव :-
अवैध धंद्यांना खत पाणी घालणाऱ्या बिट जमादारांची बिट काढून घेत त्यांची बदली करण्याचा निर्णय ठाणेदारांनी घेतला आहे.
महागाव शहरातील परवाना धारक दारू दुकानातून शहरातील काही अवैध दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा होत असून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने शाळकरी , कॉलेजवयिन विद्यार्थी,युवक तसेच नागरिक या अवैध दारूच्या आहारी जावून व्यसनाधीन बनत आहेत त्यामुळे या दारुड्यांचा शहरात मोठा उच्छाद माजला असुन यावर कारवाई करण्याची जबाबदारी असलेले बिट जमादार मुन्ना शुक्ला मात्र या अवैध दारू विक्रेत्यांकडून दरमहा खावटी वसूल केल्यासारखी रक्कम गोळा करून आपली तिजोरी भरीत असल्याने कायदा व सुव्यवस्थेची ऐसी तैसी झाली त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रतीक नरवाडे यांनी या अवैध दारू विक्रीला खतपाणी घालून हा धंदा जोमात सुरू करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या बिट जमादार शुक्लांवर कारवाई करण्याची मागणी थेट जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली होती त्याची दखल घेत महागावचे ठाणेदार धनराज निळे यांनी या वादग्रस्त बिट जमादाराची बिट मधुन उचल बांगडी करून दुसरीकडे त्यांची बदली केली असल्याची माहिती आहे.
प्रतिक नरवाडे यांच्या धाडसी निर्णयाचे महागाव वासियांनी कौतुक केले.