कृषी

शेतकरी साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 साली पहिली सामूहिक आत्महत्या केली, शेतकरी आत्महत्या का ? करतो सरकारला याचे उत्तर मात्र दुर्दैवाने अजुनही शोधता आले नाही

शेतकरी साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 साली पहिली सामूहिक आत्महत्या केली, शेतकरी आत्महत्या का ? करतो सरकारला याचे उत्तर मात्र दुर्दैवाने अजुनही शोधता आले नाही 

 

(शिवानंद राठोड संपादक )

 

चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव पाटील करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी पत्नी मालती व चार मुलांसह दत्तपूर (वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या घटनेला (ता. 19) 38 वर्षे पूर्ण होत आहेत.साहेबराव, मालती आणि त्यांच्या चार चिमुकल्यांच्या सामुहिक आत्महत्येची बातमी 20 मार्च ला सकाळच्या सुर्यकिरणांसोबत राज्यातील प्रत्येक गावागावात पोहंचली 40 एकर शेतीचा मालक असलेले चिलगव्हाण या गावचे सतत 11 वर्षे सरपंच राहिलेले, संगीत विशारद असलेले, उत्तम भजन गाणारे साहेबराव करपे यांचा गावात मोठा वाडा; पण भग्नावस्थेत. त्या वाड्यातच त्यांचा संसार होता. थकीत बिलापोटी १९८६ च्या मार्च पुर्वीच एमएसईबीने त्यांच्या शेतातील वीजजोडणी थकीत बीलामुळे खंडित केली. 40 पैकी 15 एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू, चणा या पिकांना पाणी न मिळाल्याने वाळला अन् सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते सैरभैर झाले. मनाने खचून गेलेल्या साहेबराव करपे आणि त्यांची पत्नी मालती यांनी काहीतरी मनाशी ठरवले व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले.

 साहेबराव करपे हा सहकुटुंब आत्महत्येच्या निर्णयापर्यंत का ? आला, या प्रश्नाने संवेदनशील मनांना अस्वस्थ करून सोडणारी हि घटना होती या घटनेनंतर राज्यात शेतकरी आत्महत्यांची जी साखळी सुरु झाली, ती आज पर्यंत अव्याहतपणे सुरु आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकऱ्यांसाठी काही तरी करेल, असा आशावाद साहेबराव करपे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नोंदवला होता. पण तो आशावाद प्रत्यक्षात आला का? याचे उत्तर मात्र दुर्दैवाने अजूनही होकारात आलेले नाही.या सामुहिक आत्महत्येची नोंद शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या अशी केली गेली. या आत्महत्येनंतर सुरु झालेले शेतकरी आत्महत्यांचे चक्र आजही सतत सुरूच आहे. या मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ ही झालेली आहे. या सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी ठिक ठिकाणी शेतकरी एकदिवसीय अन्नत्याग करून आंदोलन करतात 

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close