खा.हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने महागाव येथे एक दिवसीय दिव्यांग शिबिरात 870 लाभार्थ्यांची तपासणी,गरजूंना मिळणार मोफत साहित्य
खा.हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने महागाव येथे एक दिवसीय दिव्यांग शिबिरात 870 लाभार्थ्यांची तपासणी,गरजूंना मिळणार साहित्य
महागाव प्रतिनिधी सचिन उबाळे – ( दि. 02 ) हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी तालुकानिहाय नाव नोंदणी मोजमाप व तपासणी शिबिराचे आयोजन हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातील 2 तालुक्यात करण्यात आले आहे. महागाव तालुक्यात या शिबिराचे 02 फेब्रुवारी या एक दिवसीय आयोजन जिल्हा परिषद शाळा महागाव येथे करण्यात आले होते. यामध्ये 870 च्या वर दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली असून गरजू दिव्यांगाना लवकरच साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्या सौजन्याने भारतीय कृत्रिम अंग निर्माण कानपूर, जिल्हा प्रशासन , जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग व गोदावरी फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून २०२०-२१ मध्ये तपासणी करून जवळपास ४ हजारच्या वर दिव्यांग बांधवाना २ कोटी ७७ लक्ष रुपयाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले होते. तश्याच प्रकारचे शिबीर यावर्षी सुद्धा घेण्यात येत आहे, यावेळी, बोलतांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ.बी.एन.चव्हाण म्हणले की दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे खासदार हेमंत पाटील हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले खासदार आहेत. आणि यातून जे समाधान मिळते ते जगातील कुठल्याही समाधानापेक्षा वेगळे आहेत.
या शिबिराला उपस्थित
शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ.बी.एन.चव्हाण,नगरसेवक तथा जेष्ठ शिवसैनिक रामराम नरवाडे,शिवसेना तालुका प्रमुख राजू राठोड, भाजपा तालुका प्रमुख दीपक आडे,माजी उपनागरदयक्ष सुरेश नरवाडे,भाजपा शहर प्रमुख विलास शेबे,उपतालुक प्रमुख पवन राठोड,विभाग प्रमुख इंदल राठोड,परमेश्वर जाधव,युवासेना विभाग प्रमुख शिवाजी गोपणवड,प्रहार तालुका प्रमुख पवन धरणकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल आढागळे,उपतालुका प्रमुख प्रवीण गावंडे, डॉ प्रकाश राठोड, शंकर चव्हान, जय जाधव, अविनाश जाधव,अरविंद चव्हान,तहसीलदार राठोड,गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस,नायब तहसीलदार थोटे,आरोग्य सेवक दादाराव थोरात,प्रशांत आढागळे, विष्णू वैरागडे, अलिमको टीमचे डॉ.रुक्मिणी सोनेवाड, डॉ रबिना, वैभवी सावंत, डॉ महेश कुमार, शेख कलीम , ज्ञानेश्वर जाधव, ब्रिजेश सैनी, ओम द्विवेदी, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी चंद्रसेन आढागळे,गोदावरी शाखेचे कर्मचारी प्रवीण आढागळे यांनी विशेष परिश्रम घेतले