सामाजिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच समतेचं धोरण आखण्यात शासन दुर्लक्ष करत असल्याचे आरोप डॉ.विलास काळे यांनी केले

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच समतेच धोरण आखण्यात शासन दुर्लक्ष करत असल्याचे आरोप डॉ. विलास काळे यांनी केले

ब्युरो रिपोर्ट :

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू चौक या ठिकाणी ओबीसी जन मोर्चा ,भारतीय पिचडा शोषित संघटन, ओबीसी क्रांती दल या संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी बोलताना डॉक्टर विलास काळे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी जन मोर्चा ,केंद्रीय कार्यकारणी सदस्य भारतीय पिछडा शोषित संघटन, संस्थापक ओबीसी क्रांती दल हे बोलताना म्हणाले ,भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समतेच वातावरण निर्माण व्हावं म्हणून ,आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे धोरण आणले. मुलांकरता शिक्षणासाठी वस्तीगृहाची व्यवस्था केली. प्रत्येक जातीतील मुलगा हा शिकला पाहिजे याकरता वेगवेगळ्या जात समूहाला शिक्षणाकरता प्रेरित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली,वेगवेगळ्या योजना आणल्या ,शेतीवर वेगवेगळे प्रयोग करण्याकरत आणि सामाजिक एकीकरणाकरता समतेचा वातावरण निर्माण केलं ,सध्याचं सरकार हे समतेच वातावरण करण्याकरता अपयशी ठरता की काय? या पद्धतीची व्यवस्था निर्माण झालेली आहे .ओबीसी करता असलेल्या महाज्योतीला देतअसलेला फंड ,आणि सारथी या संस्थेला देत असलेला फंड याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे, या तफावती मुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झालेला आहे .सरकारने राजर्षी शाहू महाराजांच्या समतेचा निकष सर्व समाजासाठी लावावा ,आणि न्यायाची भूमिका घ्यावी असे विचार डॉक्टर विलास काळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले .याप्रसंगी राजू देशमुख, मंगला मून,हेमंत कुमार जगताप ,दहिकर अशोक महल्ले, प्रधान खुडुकले, नरेंद्र गद्रे ,देविदास मुनेश्वर, हरिदास अभंग, आनंद भगत ,राजूभाऊ रोकडे, सदानंद बोपींनवार ,सिद्धार्थ देठे ,ज्ञानेश्वर रायमल आदी बांधव उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close