महागाव प्रतिनिधी ( सचिन उबाळे ) :- पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ग्रामीण रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
गोरगरीब जनतेच्या जीवनमरणाशी निगडित असलेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत मागील चार ते पाच वर्षांपासून उद्घाटनाअभावी बंद अवस्थेत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नावर आमदार, खासदार आणि सत्ताधारी लोक प्रतिनिधींची दातखिळी उघडत नसल्यामुळे महागाव तालुका पत्रकार महासंघातर्फे 20 नोव्हेंबर पासून महागाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या उपोषणात पत्रकार महासंघाचे आहे. अध्यक्ष गणेश पाटील भोयर, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष मोहन पांढरे, सचिव अमोल राजवाडे, सहसचिव नरेंद्र नप्ते, सरचिटणिस शेख तस्लीम, कोषाध्यक्ष मंचक गोरे, शहराध्यक्ष संजय कोपरकर, उपशहराध्यक्ष पवन रावते यांच्यासह पत्रकार महासंघाचे सर्व ६० सदस्य सहभागी होणार आहेत. पत्रकारांनी एखाद्या सामाजिक प्रश्नावर आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ असून पत्रकार महासंघाच्या या आंदोलनास
महागाव मुख्यालयी बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. साडेचार कोटींच्या वर रक्कम खर्च करून बांधलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा हा पांढरा हत्ती असाच किती काळ पोसायचा, असा प्रश्न तालुक्यातील संतप्त जनता विचारत आहे.अनेक सामाजिक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे