सामाजिक
गुंज येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

महागाव :-
गुंज येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
महागाव तालुक्यातील गुंज येथे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक सोहळा गावकरी व शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . गुंज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृर्ती पुतळ्याला हार अर्पण करून पूजन करण्यात आले छत्रपती शिवरायांच्या जय घोषामध्ये शिवराज्याभिषेक दिन गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंचक गोरे ,शरद जाधव ,राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रमोद जाधव मराठा सेवा संघाचे दिनेश तळणकर,समशेर खॉ पठाण,मनोज गुप्ता,राम देवकते,परमेश्वर चव्हाण विजय जाधव संदीप काळे ज्ञानेश्वर जाधव गणेश गायकवाड विठ्ठल जाधव अविनाश जाधव शुभम बोक्षे साहेबराव मेटकर देवा चव्हाण शिवाजी मेटकर उपस्थित होते