सामाजिक

लाडक्या बहिणींना KYC साठी मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन – जगदिश नरवाडे ..

महागाव प्रतिनिधी (सचिन उबाळे )

लाडकी बहीण योजनेतील KYC अडचणींमुळे हजारो महिला वंचित – मुदतवाढ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

राज्य शासनाच्या गाजलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणा व अपुऱ्या नियोजनामुळे जिल्ह्यातील हजारो महिला लाभार्थी थेट लाभापासून वंचित राहिल्या आहेत. आवश्यक असलेली ग्राहक ओळख व पडताळणी (KYC) कागदपत्रांची प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने पात्र महिलांना आर्थिक मदतीपासून दूर ठेवण्यात आले आहे.

या गंभीर अन्यायाविरोधात जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. जगदीश नरवाडे यांनी तहसीलदार श्री. अभय मस्के यांना निवेदन देत प्रशासनाला धारेवर धरले. “योजना महिलांसाठी आहे की कागदपत्रांसाठी?” असा थेट सवाल करत, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गरीब, कष्टकरी, ग्रामीण व विधवा महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ग्रामीण भागातील महिलांना इंटरनेट सुविधा, सेवा केंद्रांची कमतरता, आधार-पॅन जोडणीतील तांत्रिक अडचणी, अपुरी माहिती व प्रचंड गर्दी यामुळे KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही. हे वास्तव माहिती असूनही शासनाने कोणतीही मुदतवाढ न दिल्याने महिलांचे हक्क हिरावले जात असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

“लाडकी बहीण योजना ही कागदांच्या अडचणीत अडकवून निष्प्रभ केली जात असून, तात्काळ KYC प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी व वंचित महिलांना पुन्हा संधी देण्यात यावी, अन्यथा जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा श्री. नरवाडे यांनी दिला.

तहसीलदार श्री. अभय मस्के यांनी निवेदन स्वीकारले असले तरी, जोपर्यंत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका समितीने जाहीर केली.

——————+++

महिला भगिनी केवायसी करताना 30, 31 डिसेंबरला मोबाईलवर ओटीपी येत नव्हते सर्वर कूच कामि झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका गरीब महिलांना बसला तहसीलदार अभय मस्के यांनी मुबई येथील हेड प्रमुख जाधव यांच्या सोबत बोलून लवकरच मार्ग निघेल असे सांगितले तात्काळ महिलाना न्याय न मिळाल्यास लाडकी बहीण योजनेतील KYC अडचणींमुळे हजारो महिला वंचित – मुदतवाढ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

राज्य शासनाच्या गाजलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणा व अपुऱ्या नियोजनामुळे जिल्ह्यातील हजारो महिला लाभार्थी थेट लाभापासून वंचित राहिल्या आहेत. आवश्यक असलेली ग्राहक ओळख व पडताळणी (KYC) कागदपत्रांची प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने पात्र महिलांना आर्थिक मदतीपासून दूर ठेवण्यात आले आहे.

या गंभीर अन्यायाविरोधात जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. जगदीश नरवाडे यांनी तहसीलदार श्री. अभय मस्के यांना निवेदन देत प्रशासनाला धारेवर धरले. “योजना महिलांसाठी आहे की कागदपत्रांसाठी?” असा थेट सवाल करत, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गरीब, कष्टकरी, ग्रामीण व विधवा महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ग्रामीण भागातील महिलांना इंटरनेट सुविधा, सेवा केंद्रांची कमतरता, आधार-पॅन जोडणीतील तांत्रिक अडचणी, अपुरी माहिती व प्रचंड गर्दी यामुळे KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही. हे वास्तव माहिती असूनही शासनाने कोणतीही मुदतवाढ न दिल्याने महिलांचे हक्क हिरावले जात असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

“लाडकी बहीण योजना ही कागदांच्या अडचणीत अडकवून निष्प्रभ केली जात असून, तात्काळ KYC प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी व वंचित महिलांना पुन्हा संधी देण्यात यावी, अन्यथा जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा श्री. नरवाडे यांनी दिला.

तहसीलदार श्री. अभय मस्के यांनी निवेदन स्वीकारले असले तरी, जोपर्यंत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका समितीने जाहीर केली.

——————+++

महिला भगिनी केवायसी करताना 30, 31 डिसेंबरला मोबाईलवर ओटीपी येत नव्हते सर्वर कूच कामि झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका गरीब महिलांना बसला तहसीलदार अभय मस्के यांनी मुबई येथील हेड प्रमुख जाधव यांच्या सोबत बोलून लवकरच मार्ग निघेल असे सांगितले तात्काळ महिलाना न्याय न मिळाल्यास

जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल

जगदीश नरवाडे संस्थापक

जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close