पुण्यात ‘मिस्टर, मिस, मिसेस, टीन अँड किड्स इंडिया फेस २०२६’चा भव्य सोहळा

पुण्यात ‘मिस्टर, मिस, मिसेस, टीन अँड किड्स इंडिया फेस २०२६’चा भव्य सोहळा
पुणे ब्युरो : HDA प्रॉडक्शन आणि एसआर आयटी जंक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिस्टर, मिस, मिसेस, टीन अँड किड्स इंडिया फेस २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील फॅशन, व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रतिभा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सिम्बायोसिस ऑडिटोरियम, विमाननगर, पुणे येथे उत्साहात पार पडणार आहे.

या भव्य सोहळ्याचे प्रमुख आयोजक एचडीए प्रॉडक्शनचे संचालक हर्षद आवघाड असून सायली आवघाड या सह-आयोजक म्हणून कार्यरत आहेत. तसेच एसआर आयटी जंक्शनचे संचालक भूषण सातोकर आणि अंजली सातोकर हे या कार्यक्रमाचे सह-आयोजक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख सेलिब्रिटी पाहुण्या म्हणून उपस्थिती. याशिवाय मिस ग्लोबल इंडिया विजेत्या शेमोनिल वानकाडिया यांची विशेष उपस्थितीही कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.
ग्लॅमर फॅशन आयकॉनचे संचालक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष ग्लॅमर फॅशन आयकॉन वॉक सादर करण्यात येणार आहे. तर संपूर्ण फॅशन शोचे दिग्दर्शन आणि रॅम्प कोरिओग्राफी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सॅम चर्चिल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या सोहळ्यात व्यवसाय, मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘एचडीए स्टार अवॉर्ड्स २०२६’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ३० वर्षांवरील तसेच ५०+ वयोगटातील महिला आणि पुरुष मॉडेल्स यांचा विशेष रॅम्प वॉक. त्याचबरोबर नवोदित मॉडेल्स आणि फ्रेशर्सना राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी HDA प्रॉडक्शन आणि एसआर आयटी जंक्शनच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, या भव्य सोहळ्याचे “मराठी 9 न्युज” वर थेट प्रक्षेपण (लाईव्ह) करण्यात येणार आहे, त्यामुळे राज्यभरातील प्रेक्षकांना हा सोहळा घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी सुरू असून इच्छुक स्पर्धकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आयोजकांच्या मते, ‘मिस्टर, मिस, मिसेस, टीन अँड किड्स इंडिया फेस २०२६’ हा केवळ फॅशन शो नसून नवोदित कलाकार, फ्रेशर्स मॉडेल्स आणि विविध वयोगटातील स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी आहे.
अधिक माहितीसाठी या 8390609163 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



