विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४७ वा स्मृतिदिन सोहळा साजरा

पुसद जि.यवतमाळ । आज दि. 18/08/2026 विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४७ वा स्मृतिदिन सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते प्रगतीशिल शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व संस्थांचा वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी स्वागताध्यक्ष राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक, माजी आमदार श्री निलय नाईक, आमदार श्री किसनराव वानखेडे, माजी आमदार श्री ख्वाजा बेग, नगराध्यक्ष श्रीमती मोहिनी नाईक, माजी नगराध्यक्ष श्रीमती अनिता नाईक, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री धनंजय सोनी, श्री दीपक आसेगावकर, श्री वसंतराव घुईखेडकर, श्री क्रांती कामारकर, श्रीमती आरती फुफाटे, श्री प्रवीण देशमुख, श्री नितीन भुतडा, प्रा. श्री गोविंद फुके, श्री विजय जाधव, श्री नीलकंठ पाटील, जिल्हाधिकारी श्री विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
हा साेहळा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने यशस्वीरित्या आयोजन करण्यात आला.

➡ प्रगतीशिल शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतीशिल शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी संस्थांचा विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, कुलगुरु डॅा. शरद गडाख यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी पुरस्कार प्रदान करुन सत्कार करण्यात आला. यात १.संतोष सुधाकर पन्हाळे, (डाळिंब उत्पादक शेतकरी) मु.पो. सात्रळ ता. राहुरी जि. अहिल्यानगर, २. अवंतिका विजय सुकटकर, (शेतकरी व शेतमाल प्रक्रिया लघु उद्योगक) संचालिका, श्रीकृष्ण शेतिमाल प्रक्रिया उद्योग मार्केट यार्ड, पुणे, ३. संगीता वाल्मिक सांगळे, (द्राक्ष उत्पादक व निर्यातदार महिला शेतकरी) मु. सत्यगाव पो. मुंढेड ता. येवला जि. नाशिक, ४. शशांक मुकेश पाटील, (केळी उत्पादक युवा शेतकरी) मु. तांदळवाडी ता. रावेर जि. जळगाव, ५. सुशांत मोहन नाईक, मु.पो. वेतोरे ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग (आंबा, काजू उत्पादन व विक्री), ६. यशोदा वसंतराव कातबने, (फळबाग व इतर पिके) मु. धनगाव पो. ढोरकीन ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, ७. माऊली गोविंद जाधव, (करडई पीक उत्पादक) मु. सातेफळ पो. अंबासाखर ता. अंबाजोगाई जि. बीड, ८. गोपाल सूर्यमान भकते, (संत्रा उत्पादक शेतकरी) मु.पो. पारडीसिंगा ता. काटोल जि. नागपूर, ९. अशोक शिवरामजी वानखेडे, (ऊस, हळद, सोयाबीन, कापूस, फळ उत्पादक शेतकरी) मु.पो. सुकळी ता. उमरखेड जि. यवतमाळ
कृषी संशोधन संस्था : १०. अशोक कडलग, प्रमुख शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे, कृषी शास्त्रज्ञ : ११. डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी, (ऊस संशोधक व प्रसार) मु.पो. नरसोबावाडी ता. शिरोळ जि. कोल्हापूर
साभार – य.जि.मा.का .



