पुसद अर्बन बँक पूर्णतः सुरक्षित आहे,अफवांकडे दुर्लक्ष करा : जगदीश नरवाडे यांचे प्रतिपादन

पुसद अर्बन बँक पूर्णतः सुरक्षित आहे,अफवांकडे दुर्लक्ष करा : जगदीश नरवाडे यांचे प्रतिपादन
ठेवीदारांची रक्कम सुरक्षित, सर्व शाखांचे व्यवहार सुरळीत
पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष श्री. शरद मैंद यांना अटक झाल्यानंतर काही गैरजबाबदार व्यक्तींनी बँकेत घोटाळा झाल्याच्या अफवा पसरवल्या असून त्यामुळे ठेवीदारांमध्ये थोडाफार संभ्रम निर्माण झाला आहे.
मात्र बँक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पुसद अर्बन बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम व पूर्णतः सुरक्षित आहे. बँकेच्या सर्व ३७ शाखांमध्ये नियमितपणे व्यवहार सुरू आहेत.
महागाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. जगदीश नरवाडे यांनी सांगितले की, “बँकेतील सर्व ठेवीदारांची रक्कम पूर्णतः सुरक्षित आहे. कोणत्याही शाखेतून ठेवी काढण्याची घाई करण्याची गरज नाही. आपल्या भागातील नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून निश्चिंत राहावे.”
बँकेचे अधिकारी आणि संचालक मंडळानेही जनतेला आवाहन केले आहे की, चुकीच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता बँकेवर विश्वास ठेवा. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असून सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत.
———————————-
ठेवी दाराच्या पैशाचा विनियोग हे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसह जमानतदार यांची स्थावर मालमत्ता बँक मोर्गेज करून घेते रिझर्व बँकेच्या नियमानुसार डिपॉजिट रक्कम असल्याने ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये आफवे मुळे ३७ शाखे पैकी महागाव पुसद डिग्रस दारव्हा या चार शाखेतून काही ठेवीदार आपल्या ठेवी विड्रोल करत आहे इतर शाखे मधून नाही ठेवी दाराणी घाबरून न जात विड्रोल करून नये
जगदीश नरवाडे
अध्यक्ष महागाव तालुका व्यापारी महासंघ यांनी जनतेला असे आवाहन केले