ग्लॅमर फॅशन आयकॉन ऑफ इंडिया या सौंदर्य स्पर्धेचे तब्बल पाचव्यांदा यशस्वीरित्या आयोजन

ग्लॅमर फॅशन आयकॉन ऑफ इंडिया या सौंदर्य स्पर्धेचे तब्बल पाचव्यांदा यशस्वीरित्या आयोजन
पुणे:-
हि सौंदर्य स्पर्धा पुण्यातील आचार्य अत्रे रंग मंदीर येथे थाटात संपन्न झाली
पुण्यात रंगला ग्लॅमरचा जल्लोष..!
होय..! कारण “ग्लॅमर फॅशन आयकॉन ऑफ इंडिया सीझन फाईव्ह” या भव्य फॅशन शो ने
पुण्याच्या रॅम्पवर थाटात झळाळी आणली..!
सभागृहात टाळ्यांचा आणि जल्लोषाचा वर्षाव झाला..!
शेकडो स्पर्धकांनी
“किड्स”, “टीम”, “मिस”, “मिसेस” आणि “मिस्टर”
या विविध कॅटेगरीजमध्ये सहभाग घेतला..!
प्रत्येक स्पर्धकाने जबरदस्त आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केला..!
डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले
“या मंचाचा उद्देश केवळ सौंदर्य नव्हे…
तर प्रत्येक स्पर्धकातील आत्मविश्वास आणि त्यांच्या स्वप्नांना पंख देणं हा आहे…!”

अनेक नवोदित मॉडेल्सना
‘रॅम्पवर आत्मविश्वासाने चालण्याचं बळ दिलं’..!
रॅम्पवरील लाईट्स..!
साऊंड..!
आणि रंगीबेरंगी पोशाखांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं..!
प्रत्येक स्पर्धकाने आपल्या अनोख्या अंदाजात स्वतःला सादर केलं,
आणि सिद्ध केलं —
“ग्लॅमर म्हणजे फक्त दिसणं नव्हे… तर व्यक्तिमत्त्वाची चमक आहे!”
विजेत्यांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं..!
तसेच त्यांना आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन प्रोजेक्टसाठी संधी मिळणार आहे..!
“ग्लॅमर फॅशन आयकॉन ऑफ इंडिया सीझन फाईव्ह”
हा फक्त एक फॅशन शो नाही…
तर नव्या प्रतिभांना व्यासपीठ देणारा…
भारतीय फॅशनला नवा आयाम देणारा…
एक प्रेरणादायी मंच ठरला आहे..!

ग्लॅमर फॅशन आयकॉन” या भव्य सौंदर्य स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला. किड्स, टीन, मिस, मिसेस आणि मिस्टर या सर्व कॅटेगरीजमधील विजेत्यांना ट्रॉफी, क्राऊन, सर्टिफिकेट, सॅश आणि आकर्षक गिफ्ट्स देण्यात आले. स्पर्धकांसाठी खास फोटोशूट, स्टायलिश आऊटफिट्स, मेकअप, हेअरस्टाईल व प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती.
प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मंचावर आपली कला दाखवण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक, ट्रेनर्स, कोरिओग्राफर्स व संपूर्ण टीमने मोठे योगदान दिले.
या भव्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, शिमोनील वांकडिया,विकी शिंदे, कबिता शर्मा, रेणु पंजाबी, सागर सकट, प्रविण सावंत, सुभाष चव्हाण, वैशाली काळे यांच्या हस्ते पार पडले. शो चे दिग्दर्शन ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.कविता पवार आणि मीनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनिषजी मुथ्था हे होते
सुंदर अशी गणेश वंदना सादर केली ज्यांचे प्रशिक्षण विजय सर यांनी दिले होते.
कार्यक्रमात मुलं, किशोर, मिस, मिसेस, मिस्टर आणि रनवे मॉडेल अशा विविध गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
त्यापैकी विजेते ठरले हेत्वीक, नुर्वी पाटील,
हिदाया, अवांत खडसे, तितिक्षा प्रसाद, उपासना पाटील, ओमकार, रेवा दिघे, काव्या कदम, सिया
मिस्स विनर कॅटेगिरी मध्ये स्नेहा सुरवाडे, सिमरन, विनीता शर्मा,
मिसेस विनर कॅटेगीरीमध्ये मिनल राऊत, सोनाली अहिरे, प्रियंका बनसोडे,
मिस्टर कॅटेगिरी मध्ये शंकर कामठे, दिव्यम ओझा, गणेश नाईक हे विजेते ठरले

विशेष सन्मान
• स्लिक्स ब्रँड ॲम्बेसेडर प्रगन्या पाटील
नृत्य दिग्दर्शन – शुभम दिवेकर
पोशाख भागीदार –अपुर्वा यादव
• फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी–सॅन्डी बांगर
• निलेश शेवाळे
• रोहित थोरात
• कृष्ण डवरे
📰 मीडिया पार्टनर्स
• मराठी 9 न्युज (शिवानंद राठोड, सचिन उबाळे)
ज्युरी पॅनेल
• आंतरराष्ट्रीय मॉडेल – शेमोनील वांकाडिया
• विकी शिंदे
• कबिता शर्मा
• रेणु पंजाबी
या कार्यक्रमात सुजाता काळे आणि त्यांच्या टीम यांनी मेक अप पार्टनर म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.
सूत्रसंचालन
• भारतातील सर्वात मोठा रॅपर – AVG (अभिनंदन गायकवाड)



