उटी व बोथा येथील जि.प.शाळेला वर्गखोल्या द्या अन्यथा आंदोलनाची वेळ – प्रशांत गावंडे

उटी व बोथा येथील जि.प.शाळेला वर्गखोल्या द्या अन्यथा आंदोलन करणार – प्रशांत गावंडे
महागाव ब्युरो :-
“जि. प. मराठी शाळा उटी व बोथा येथील शाळेसाठी वर्ग खोल्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांच्या पुढाकाराने गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी महागाव यांना निवेदन”
शिक्षण हक्क कायदा, २००९ नुसार, ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळणे हा मुलभूत अधिकार आहे.
या कायद्यात, शासनाने मुलांना शाळेत येण्यासाठी आणि शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक भौतिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी निश्चित केली आहे.
यामध्ये शाळेत पुरेसा प्रकाश, खेळण्यासाठी मैदान, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, तसेच शिक्षण साहित्य (उदा. पाठ्यपुस्तके, गणवेश) यांचा समावेश होतो.
जर शासनाने या सुविधा पुरवण्यात कमी पडल्यास, ते कायद्याचे उल्लंघन मानले जाते.
त्यामुळे, शासनाचे कर्तव्य आहे की, विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
जि. प. मराठी शाळा उटी व बोथा येथील शाळेसाठी वर्गखोल्या मागणीसाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच उपक्रमशील असलेले स्व. जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उटी यांच्या अंतर्गत सामाजिक कार्य करणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांच्या पुढाकाराने गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी महागाव यांना निवेदन देण्यात आले.
जि. प. मराठी शाळा उटी येथे एक ते आठ वर्ग असून शाळेत एकूण सहा वर्ग खुल्या आहेत .त्यापैकी दोन वर्ग खोल्या अतिशय धोकादायक असल्याकारणाने त्यांचे निर्लेखन प्रस्ताव मंजूर झाले असून आता फक्त अध्यापनासाठी चारच वर्ग खोल्या उपलब्ध आहेत .शाळेचा पट 2025 -26 मध्ये 130 असून शाळेला दोन वर्गखोल्याची अत्यंत आवश्यकता आहे . त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोथा येथे इयत्ता 1 ते 5 वी पर्यंत शाळा असून पटसंख्या 101 आहे. शाळेत 4 शिक्षक कार्यरत आहेत. परंतु शाळेत सध्या 2 वर्गखोली आहेत. त्या मुळे मुलांचे अध्यापन करण्यास अडथळा निर्माण होतो मुलांना शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, शाळेच्या जुन्या 2 वर्ग खोली पाडण्यात आले असून त्याला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत पण आणखीन त्याबदल्यात शाळेला नवीन खोली मिळाली नाही. अशी परिस्थिती तालुक्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळेची आहे, प्रशासनाला प्राथमिक निवेदन देऊन विभागातील आमदार ,राज्यमंत्री ,पालकमंत्री यांना सुद्धा पाठ्यपुरवा करून तात्काळ बरोबर वर्गखोल्याच्या मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद यांना गावकरी भेटणार आहोत, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गखोल्या तात्काळ मिळाले नाही तर उपोषणाचा इशारा सुद्धा देणार आहोत असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे सांगितले.
निवेदन देताना बोथा गावच्या सरपंच सौ यशोदा गायकवाड , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद कवडे, उपाध्यक्ष अमोल पाईकराव, मुख्याध्यापक विजय ब्याळे सर ,संतोष मोरे सचिन मस्के, प्रकाश व्यवहारे,
उटी जिल्हा परिषद मराठी शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू मोरे, मुख्याध्यापक पठाण सर, विलास खिल्लारे, सुरेश खिल्लारे ऋषिकेश शेळके, गजानन बावणे ,आशिष शिंदे, किसन वानखेडे, कासारबेळ येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक तुमवार हजर होते…