कृषी
वडद तलावाचे पाणी टेंभी शेतशिवारात सोडण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी (प्रसाद शिंदे) :- महागाव तालुक्यातील वडद तलावाचे पाणी टेंभी शेतशिवारातील कालव्यात सोडण्यात यावे या आशयाचे निवेदन टेंभी येथील शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे उपविभाग पुसद यांना दिले आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक रित्या उध्वस्त झाला असून खरीप हंगाम वाया गेले आता रब्बी हंगामावर मदार अवलंबून असून अपूर्ण सिंचनामुळे रब्बी हंगाम सुद्धा धोक्यात आला आहे टेंभी येथील काही शेतकऱ्यांनी टेंभी शेतशिवारातील कालव्यात पाणी सोडण्याची मागणी लघु पाटबंधारे उपविभाग पुसदच्या सहाय्यक अभियंता त्यांच्याकडे केली आहे लघु पाटबंधारे उपविभाग काय निर्णय घेईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे मराठी नाईन न्यूज विशेष प्रतिनिधी प्रसाद शिंदे