निखिल वागळे यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी – अन्यथा महागाव पत्रकार महासंघ रस्त्यावर उतरणार
निखिल वागळे यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी – अन्यथा महागाव तालुका पत्रकार महासंघ रत्यावर उतरणार
महागांव (सचिन उबाळे )
पुरोगामी विचारवंत तथा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला शुक्रवारी पुणे येथे “निर्भय बनो ” या कार्यक्रमाला जातांना भाजपा कार्यकत्यांनी भ्याड हल्ला चढविला, निखिल वागळे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली पोलीस मात्र बघ्याच्या भुमिकेत घटनेचा असुरी आनंद घेत होते. निखिल वागळे यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी विचारांवर “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ” करण्यात आलेला हल्ला आहे.देशात कट्टरवादी विचारसरणी जोर धरत असून संविधानिक मूल्यांना पूर्व नियोजित पणे पायदळी तुडविण्यात येत आहे वागळे यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न असून या घटनेचा महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे संपूर्ण घटनेची नि:पक्ष चौकशी करून हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा पत्रकार महासंघ रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे महागाव पत्रकार महासंघाच्यावतीने तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना ह्या निवेदनामध्ये मागणी केली आहे