शेतकऱ्यांना बियाण्याचा स्वातंत्र्य तरी द्या ( शेतकरी नेते मनिषभाऊ जाधव )
शेतकऱ्यांना बियाण्याचा स्वातंत्र्य तरी द्या ( शेतकरी नेते मनिषभाऊ जाधव ),…. या कृषिप्रधान देशात संशोधनाचा वाणवा आहे आम्ही चंद्रावर चाललो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे , पण त्यासोबत कृषी क्षेत्रात संशोधनात होत असलेली शेतकऱ्यांची उपेक्षा पण शेतकऱ्यांना आधुनिक सुधारित जीएम सीड्स तंत्रज्ञान देण्यामध्ये हे शासन अजूनही अपयशी आहे प्रतिकूल परिस्थितीत तग व उत्पादनक्षम असलेले जेनेटिक मॉडिफाइड जीएम सीड या कृषी प्रधान देशात लागवडीसाठी प्रतिबंधित केलेले आहे कृषी संशोधनाच्या नावावर कोट्यावधी रुपये खर्च होत असत पण एकही वाण अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाही हे आमचं दुर्दैव आहे , BG-2 ,JS -335 , च्या समोर आमचं संशोधन अजून पोहोचलेलं नाही आम्ही येथेच थांबून आहोत हे कृषी विद्यापीठ आज पांढरा हत्ती ठरलेल आहे शेतकऱ्यांसाठी याची उपयोगिता शून्य आहे चांगली वाण नाही संशोधन नाही , शेतकऱ्यांसाठी शाश्वत धोरणाचा अभाव आहे शेतकऱ्यांनी जगावं कसं मायबाप तुम्ही सांगा,……………..!!
शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष यवतमाळ