फुलसावंगीच्या सरपंच पदी सौ.सारजाबाई वाघमारे यांची बिनविरोध निवड
फुलसावंगीच्या सरपंच पदी सौ.सारजाबाई वाघमारे यांची बिनविरोध निवड
फुलसावंगी प्रतिनिधी( सचिन उबाळे ) ग्राम विकास पॅनलच्या सौ सारजा बाई वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आजच्या निवड प्रक्रियेत ग्रा.प कार्यालयात सरपंच पदासाठी दोन अर्ज आले त्यात सौ सारजा बाई गणेश वाघमारे आणि दुसरा एक असे दोन अर्ज सरपंच पदासाठी आले दुपारी दोन वा सरपंच निवड प्रक्रिया होती तत्पूर्वी दुसऱ्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने
सौ सारजाबाई गणेश वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी अनेक घडामोडी घडल्या,तीन वर्षापुर्वी परिवर्तन पनल व ग्रामविकास पनल या दोन प्रमुख पनल मध्ये निवडणुक झाली होती त्यामध्ये परिवर्तन पॅनल ने एक हाती सत्ता स्थापन केली होती.प्ररन्तु अन्तर्गत गटबाजीमुळे परिवर्तन पॅनल मधील काही सदस्यांना एकत्र येत शीतल भिषे यांच्यावर अविश्वास चा ठराव आणला त्यामुळे त्यावेळी शीतल भिसे यांनी ग्रामविकास पॅनल मध्ये प्रवेश केला होता.परंतु त्यांना सरपंच पदावरुन् पाय्उतार व्हाव लगल् त्यानंतर अशा काही घडामोडी घडल्या की परिवर्तन पॅनल च्या काही सदस्यानी ग्रामविकास पॅनल च्या पॅनल प्रमुखाशी हात मिळवणी करत आज नव्याने सत्ता स्थापन केली.आज नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये निवडणूक आधिकारी म्हणून पंजाब रणमले,( वि आधिकारी प स महागाव ) संजय पडळकर, ग्रा वि आधिकारी फुलसावंगी यांनी काम पाहिले. यावेळी विजय महाजन,अनुप नाईक,कांशीराम वैद्य,शमशेर लाला,अजय देशपांडे,योगेश वाजपेय, अमरदिप दळवे,नरेंद्र शिंदे, वसंता भिसे,नासिर भाई,आरिफ लाला, संजय वैद्य शे मजहर,याकूब लाला,मंगु नाईक,वसंता भिसे,गजानन वैध्य,तस्लिम् शेख,अनिस भाई,तानाजी शिंदे,रवींद्र पांढरे,सह सौ. शितल गजानन भिसे,नवाब जानी कमरवेग,.दिनेश त्र्यंबकराव नाईक,इमरान खान शफी खान पठाण,कुणाल सुभाषराव नाईक,गजानन हरिभाऊ प्रतापवार,संदिप हनवता वायकुळे,अनिल किसन राठोड,मंगलाबाई काशिनाथ वैद्य,शाहीन ईकबाल पठाण,राजकुमारी कैलास भोयर,सुलोचना बाबुराव व्हडगिरे,सईदाबेगम इकरामोद्दीन नवाब,रेखा गणेश भगत,अंजुम परवीन शेख अन्सार,मारूफ जान गुलशेर खान,सह
ग्रा पं चे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सौ सारजा बाई वाघमारे यांचेवर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.