सामाजिक

जगदीश नरवाडे यांनी ७६ कुटुंबांना घरकुलासाठी मालकी हक्काची जमीन उपलब्ध करून दिली

जगदीश नरवाडे यांनी ७६ कुटुंबांना घरकुलासाठी मालकी हक्काची जमीन उपलब्ध करून दिली

महागाव प्रतिनिधी :- (सचिन उबाळे )

घरकुल योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी जमीन मालक जगदीश उत्तमराव नरवाडे यांच्या सामाजिक पुढाकारातून आमनी येथे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या मालकीची जमीन उपलब्ध करून देत एकूण ७६ लाभार्थी कुटुंबांना खरेदीखत व सातबारा उतारे देऊन जमीन त्यांच्या नावावर मालकी हक्काने करण्यात आली आहे.

या जागेचा नामकरण उत्तमराव शंकरराव नरवाडे बिटरगावकार नगर या नावाने नामकरण करण्यात आले

या उपक्रमासाठी तहसीलदार श्री अभय मस्के बीडीओ श्री दत्तात्रय कदम तलाठी सीमा कदम आमनी गावच्या सरपंच सौ. सुनीता सुनील राठोड, शंकर चव्हाण बाबुसिंग राठोड गजानन गायकवाड दादाराव चवरे उत्तमपुरी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली.

 

घरकुलासाठी जमीन नसल्यामुळे अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या कुटुंबांचा प्रश्न यामुळे सुटला असून, आता शासनाच्या घरकुल योजनेचा थेट लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लाभार्थ्यांच्या जीवनात सुरक्षितता, स्थैर्य व आत्मसन्मान निर्माण झाला असून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शासनाला सहकार्य केल्याबद्दल महागाव पंचायत समितीचे बीडीओ श्री दत्तात्रय कदम यांनी कार्यालयामध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत जमीन मालक

सिंधुताई उत्तमराव नरवाडे

जगदीश नरवाडे

सौ रसिका जगदीश नरवाडे यांचा ग्रामपंचायत च्या वतीने कपडे आहेर करून सत्कार करून आभार मानले

————–

जीवनात येऊन समाजास काही देणं लागते या भावनेतून माझ्या वडिलांनी तीस वर्ष अगोदर लोकांना राहण्यासाठी दिलेली जागा त्यांच्या नावावर सातबारा करून दिला त्यामुळे सर्वांचे घरकुल मार्ग मोकळा झाला अडीच एकर जमीन ही प्रॉपर्टी मधून कमी झाली सर्वांना घरकुलाचा लाभ मिळत आहे त्याचा आनंद मला होत आहे

जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close