मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची शाहूराज देवसरकर यांनी घेतली भेट
मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची शाहुराज देवसरकर यांनी घेतली भेट
यवतमाळ/ प्रतिनिधी
थंडावलेल्या मराठा आंदोलनाला धार देणारे अंतरवली सराठा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे चिरंजीव शाहूराज पाटील हे अंतरवली सराठी येथे जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट त्यांनी घेतली
आणि मराठा समाजाच्या ज्या आरक्षणासंदर्भात मागणी आहेत त्या विषयावर चर्चा केली आणि त्यांना आपला पाठिंबा दर्शविला महागाव उमरखेड मतदार संघामध्ये राजकारणापासून अलिप्त असलेले शाहूराज पाटील देवसरकर यांनी समाजासाठी एक पाऊल पुढे म्हणून उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि समाजाच्या प्रति आपले कर्तव्य पार पाडल्याचे दिसुन येते