पाळोदी येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या फलकाचे अनावरण
पाळोदी येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या फलकाचे अनावरण
ब्युरो रिपोर्ट दारव्हा :-
दारव्हा तालुक्यातील पाळोदी या गावामध्ये नवयुवक पंचशील मंडळाच्या वतीने आज रविवार दि.26/11/2023 ला पाळोदी येथील बौद्ध विहार मध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला,2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस या प्रदीर्घ कालावधीत लिहिली गेलेली भारताची राज्यघटना अर्थात संविधान खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय लोकशाहीचा श्वास आहे! यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत मुक्ति मोर्चा चे तालुकाध्यक्ष मा. प्रशांत ठाणे हे होते तर प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य मा. गजानन डेरे होते सकाळी 8वाजता पंचशील ध्वजाचे पुजन जी. प शिक्षक मा. हनुमान तलवारे यांनी केले, सम्राट अशोक यांच्या फलकाचे अनावरण उपासिका यमुनाबाई डेरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी मनवर यांनी केले, प्रास्ताविक मधुकर तलवारे यांनी केले तर आभार प्रदर्शन दादाराव इंगोले यांनी केले तर यावेळी प्रमिलाबाई मनवर, संदिप तलवारे, दादाराव गवई राहुल सिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली गावातील बहुसंखेने उपासक आणि उपासिका यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी नवयुवक पंचशील मंडळ चे कार्यकर्ते चंद्रकांत डेरे किरण इंगोले,गजानन डेरे,ज्योती खिराडे, प्रणिता खडसे, नलू नगराळे, संगीता मनवर,शिलाबाई माहुरे, गिरजाबाई खडसे,कमलाबाई इंगोले, कौसल्याबाई डेरे,संगीता तलवारे, पर्वाताबाई तलवारे, गंगाबाई सिरसाट किरण इंगोले मंगेश मनवर,किशोर सोनोने, सम्यक खिराडे,सुरज बागडे, सुगत इंगोले, रोशन मनवर धीरज डेरे,आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले ….