सवना नगरीत विठ्ठल नामाच्या गजराने आनंदाचे वातावरण

सवना नगरीत विठ्ठल नामाच्या गजराने आनंदाचे वातावरण
महागाव – सचिन उबाळे
वारकरी संप्रदायाचे मायबाप पांडुरंग परमात्मा यांच्या आषाढी एकादशी दिवशी महागाव तालुक्यातील कलगाव वाकोडी, वेणी मोरथ, डोंगरगाव, महागाव माळकिनी, टेंभी, फुलसावंगी ,भांब , पुसद गावातील असंख्य भाविकांची सवना येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी सहा वाजता पूजेचे मानकरी सुभाषराव देशमुख व त्यांच्या अर्धांगिनी जयश्री यांच्या हस्ते अभिषेक करून महाआरती करण्यात आली.
या आरतीला गावातील असंख्य भाविक सुद्धा उपस्थित होते.
विठ्ठल मंदिर येथून विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेची गावांमधून पालखी सोहळा टाळ मृदंगाच्या जयघोष काढण्यात आली यावेळी नवचंडी का देवी भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, दत्त संप्रदाय भजनी मंडळ,भारुडी भजनी मंडळ नी भाग घेतला होता
या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच येणाऱ्या भाविकांना उपवास च्या फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती .
यावेळी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष,गणेशराव देशमुख व भावीक
डॉ अमोल देशमुख, किसनराव सरसमकर, विठ्ठल गावंडे, प्रकाश ठाकरे, अजय सुकळकर, डॉ गोपाळ गंधेवार, गोपाळ सरसमकर,ओम देशमुख, संतोष देशमुख, पंजाब देशमुख, मुन्ना देशमुख शिवशंकर सुरोशे मनोज गोरे, उपस्थित होते