सामाजिक

विरशैव लिंगायत समाजाने संघटित झाल्याशिवाय प्रगती शक्य नाही रामदास पाटील सुमठाणकर यांचे कपिलाधार धर्मसभेत आवाहन

 

ब्युरो रिपोर्ट :- कपिलधार (बिड )

संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी कपिलाधार येथे दर वर्षी कार्तिकी पौर्णिमेला यात्रा भरते,या यात्रेला 450 वर्षे जुनी परंपरा आहे.राज्यासह देशभरातील महाराष्ट्र, कर्नाटक तेलंगना येथील लिंगायत बांधव दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात शिव नामाचा जय घोष करत शेकडो दींड्या अनेक मैलाचा प्रवास करत भक्ती भावाने या पवित्र भूमीत दाखल होतात असे सांगून कपिलाधार हे लिंगायत समाजाचे माहेरघर असून,अनेक शिवाचार्य यांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न होत असते असे प्रतिपादन केले.

समाजाच्या जडण घडणीत महत्वाची भूमिका बजावणारे मठ आणि मंदिर ही समाजाची श्रद्धास्थान आहेत. पण आज घडीला हजारो वर्षांची परंपरा असलेली अनेक मठ भग्न अवस्थेत पडले आहेत.त्यांचा विकास करण्यासाठी सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.असेही मागणी केली. तसेच समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडविण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी धर्म सभेचे आयोजन करण्यात येते.असे सांगितले.या पवित्र जागेवर धर्म सभा चालविण्याची परंपरा वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आहे यांची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे आणि हिचं परंपरा व्यासपीठावरील शिवाचार्यांनी समोर चालू ठेवली ही बाब कौतुकास्पद आहे असे सांगून सामाजिक धार्मिक आणि अध्यात्मिक यांचा संगम असणारी ही धर्म सभा समाजाला दिशा देणारी आहे असेही रामदास पाटील म्हंटले.

समाजाच्या इतिहासाबद्दल सांगताना पाटील म्हणाले,एकेकाळी प्रगत, व्यापारी असणारा हा समाज आज कुठे तरी चाकरी करताना दिसत आहे हे फार विदारक वास्तव म्हणावं लागेल असे खेद व्यक्त केले.बुद्धिजीवी,सुसंस्कृत आणि प्रगतिशील समाजाचा प्रवास आता उलट दिशेने सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पुढे प्रतिपादन करताना समाजातील काही विकृती बद्दल बोलताना पाटील म्हणाले पवित्र अशी धर्म सभा उधळून लावण्याच काही अहंकारी- धूर्त लोकांनी प्रयत्न केला केला, त्यांचा समाचार घेताना पाटील यांनी त्यांना सुनावले ते म्हणाले,,त्त्या पापाची फळे तुम्हाला भविष्यात नक्किच फेडावी लागतील.

समाजाला धर्म संस्काराची शिकवणं देणाऱ्यांना तुम्ही बदनाम करताय, स्वतःच्या अहंकारासाठी,

मोठेपणासाठी, धर्म सभेच्या माध्यमातून पूर्ण समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत अहात,

मी या ठिकाणी कुणाचेही नावं घेणारं नाही कारण मी तुमचं नावं घ्यावं एवढी तुमची उंची/लायकी नाही असे ही खडसावले.

ज्याला त्याग आणि समर्पण काय असतं हे माहीत आहे त्याचं नाव रामदास पाटील आहे ज्यांनी समजासाठी आधी केले मग सांगितले हे लक्षात घ्या असे ही बोलले.

समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे रात्री बेरात्री जेव्हा फोन येतात तेव्हा मन व्याकूळ होऊन जातं.आणि मनातून वाटत कुणीतरी हवं आता आपल्या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारं.

समाजातील बांधवानी आता संघटित व्हावे.प्रत्येकाने जागृत होउन काम करणे गरजेचं आहे.उच्च शिक्षण घेतलं पाहिजे.नोकरी मिळवली पाहिजे.एकमेकांना आधार देत सर्व जाती जमातीना सोबत घेऊन चाललं पाहिजे.

समाजाची आजची परिस्थिती बघता काही समाज विघातक शक्ती क्रियाशील झाल्या असून अनेक वर्षांपासून समाजाच्या नावाने धंदा मांडून आपलं उखळ पांढरं करून घेण्यात धन्य होत आहेत.थोड्याशा लालसेपोटी समाजाला विकत आहेत. स्वतःच्या मोठेपणा करीता समाजाचा लिलाव करत आहेत.

या विघातक शक्ती आपण वेळीच रोखणं हे या तरुणांचं काम आहे.

अन्यथा समाजात दूही माजेल समाजातील गट तट विकोपाला जायला उशीर लागणारं नाही अशीही चिंता व्यक्त केली.

गुरू शिष्याची आपल्या समाजात फार पूर्वी पासून चालत आलेली परंपरा आहे.तीही आता ह्या मंडळीकडून पायदळी तुडवली जात आहे. कीर्तनकार प्रवचनकार मंडळीत,मठ-मठात गटबाजी करने,

सर्व समाजाला एका चौकटीत बांधणाऱ्या गुरूंना,मठाधीशावर हल्ले करण्याइतपत घाणेरडे कृत्य घडत आहेत.मठांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून गुरूंना धमकावणे ब्लॅकमेल करणे असल्या कृतीने आपण समाजाला कुठल्या दिशेला घेऊन चाललो आहोत याचं एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे असे काही स्वयघोषित नेत्यांना फटकारले.

समाज कशाला म्हणतात?

सामजाचा विचार काय आहे,आचार काय आहे, गुण,दुर्गुण काय आहेत, विश्वासाहर्ा काय आहेत,याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.मागील ३० वर्षात समाजाला लुटल्याशिवाय काही झालं नाही.आता तरी समाजाने काळाची पावले ओळखली पाहिजे.राज्यात ३५० जात समूहाचा हा वीरशैव लिंगायत समाज जवळपास राज्याच्या लोकसंख्येत १कोटी२० लाख म्हणजे जवळपास दहा टक्क्याच्या आसपास आहे. सर्व घटकाला सोबत घेऊन चालणारा हा आमचा समाज आहे.या समाजाचा विकास होत असताना डोळ्याने आपले देव,देश आणि धर्म आणि परंपरा टिकल्या पाहिजे,आपली मठ संस्कृती टिकली पाहिजे असेही ते सांगितले.

व्यासपीठावर उपस्थित राज्याचे शिक्षण मंत्री श्री.दीपक केसरकर यांच्याकडे मागणी करताना पाटील म्हणाले आम्ही मागील वर्षी याच व्यासपीठावरून ताकतीने आम्ही जगतज्योती महात्मा बसवेश्वर अर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती.आणि या मागणीची पूर्तता तात्काळ आपल्या सरकारने केली व महामंडळ घोषित झाले.त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने मी आपले लाख लाख आभार व्यक्त करतो.पण साहेब त्याला गती देन आवश्यक आहे.

तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान २०० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील एवढ्या क्षमतेच वसतिगृह सुरू करण्यात यावं. तसेच मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारक उभारणी बाबत जागा खरेदी करून निर्णय घ्यावा हे ही विनंती केली. तसेच कपिलधार,लक्ष्मणची आष्टी यांचा ही विकासासाठी निधी मागणी केली.तसेच मदरशा आणि मंदिरांच्या धर्तीवर मठांना निधी देण्यात यावा.

मठ ही हिंदू धर्माचे प्रतीक आहेत.

आपला आचार,विचार आणि धर्म टिकला पाहिजे. आपल्या माध्यमातून मा मुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री विनंती करतो त्यांनी आमच्या या शांत संयमी समाजाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती केली.

शेवटी महाराजांनी कुणाच्याही धमक्यांना भीक घालू नये!!

माझ्या समाजाकडे -माझ्या गुरू कडे कुणी वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करू नये या माध्यमातुन तुम्हाला इशारा देतोय.आदर करता येत नसेल तर अनादर करू नका.तुम्ही संयमाने वागा हा या व्यासपीठावरून इशारा आहे.असेही ते बोलले.

व्यासपीठावर उपस्थित प.पू.गुरुवर्य वाईकर महाराज.प.पू.गुरुवर्य वसमतकर महाराज.प.पू.गुरुवर्य महंत गोपाल महाराज.प.पू .गुरुवर्य रविशंकर महाराज.प.पू .गुरुवर्य कळमनुरीकर महाराज प.पू .गुरुवर्य गुरू पादेश्वर महाराज. प.पू .गुरुवर्य चन्न बसव महाराज.प.पू .गुरुवर्य रायफटनकर महाराज. प.पू .गुरुवर्य वाळवीकर महाराज. प.पू .गुरुवर्य विश्व चैतन्य महाराज.प.पू .गुरुवर्य विरंतेश्वर शिवाचार्य महाराज,प.पू .गुरुवर्य ज्ञानसिद्ध शिवाचार्य महाराज प.पू .गुरुवर्य औसेकर महाराज.प.पू .गुरुवर्य निधनानंद महाराज.प.पू .गुरुवर्य विरपक्ष शिवाचार्य महाराज, प पु गुरुवर्य बिचकुंडेकर महाराज महंत आप्पा .राज्याचे मंत्री श्री. दीपक केसरकर साहेब,मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मंगेश जी चिवटे महाराष्ट्र कीर्तनकार मंडळाचे नावंदे काका,बालाजी पाटील, कैलास जामकर.आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close