प्रतिनिधी सचिन उबाळे :- पुरोगामी युवा ब्रिगेडच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आरोग्यसेवेसाठी समाजसेवेसाठी कार्य करणाऱ्या भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड चा *विशेष सन्मान* करण्यात आला या वेळी शाल प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली या वेळेस भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आज संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे कार्य सर्वांना माहीत आहे समाजसेवा असो किंवा रूग्णसेवा यासाठी हा फाउंडेशन ओळखला जातो तसेच महिला सक्षमीकरणासाठी विविध रोजगार मिळावे उद्योग मिळावे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच विविध ठिकाणी जनता दरबार अशा सामाजिक उपक्रमाचे आयोजन या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते या फाउंडेशनचे उद्दिष्ट हे गोरगरीब लोकांना मदत करणे साठी व ज्यांना कुठल्याही आधार नाही अशा लोकांना आधार देण्यासाठी हे फाउंडेशन कार्यकर्ते या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत हे अहोरात्र रुग्णांची सेवा करतात किती वाजता जरी पेशंट आला तरी ते स्वतः दवाखान्यात हजर राहून पेशंटची काळजी घेतात व त्यांना मदत सहकार्य करतात या सर्व कार्याची दखल घेऊन आज त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या फांऊडेशनची उद्दिष्टे
१) लोकांच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कार्य करते
२) आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी कार्य करते.पेशंट ॲडमिट करण्या पासून ते डिस्चार्ज होईपर्यंत त्यांना मदत करणे सहकार्य करणे ब्लड लागत असल्यास त्यांना फ्री मध्ये ब्लड मिळवून देण्यात येते.
३) अपंग व निराधार लोकांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देणे.
४) अन्न वस्त्र व निवारा याकरिता लोक चळवळ राबविणे. महापूर आला असता तर त्या अनुषंगाने कपडे साडीचोळी वाटप अन्नधान्य वाटप करणे.
५) शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध समस्या सोडविणे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
६) अन्याय व अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात लढा उभारणे.
७) नव युवकांसाठी विविध मार्गदर्शन शिबिर क्षेत्रातील मिळावे शासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेणे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले.
८) नैसर्गिक आपत्ती आल्यास लोकसहभागातून सहकार्य करणे व पूरग्रस्त व इतर कार्यासाठी लोकांना मदत करणे.
९) गावोगावी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आयोजित करणे.
१०) ज्या व्यक्तींना कुठलाही आधार नाही अशा व्यक्तींना आधार देणे.
११) रुग्ण सेवा हीच मानव सेवा या उद्दिष्टाने रंजल्या गांजल्यांची दिन दुबळ्यांची निस्वार्थपणे सेवा करणे .
या पुढे पण हे फांऊडेशन गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सेवेसाठी अहोरात्र काम करेल निस्वार्थपणे जनतेच्या हक्कासाठी कार्य करेल अशी ग्वाही संपूर्ण भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली.