पुणे येथे फॅशन क्वीन सिजन 1 स्पर्धेमध्ये युवतींचा उत्स्फूर्द प्रतिसाद
पुणे ब्युरो रिपोर्ट :-
पुणे येथे फॅशन क्वीन सिजन 1 स्पर्धेमध्ये युवतींचा उत्स्फूर्द प्रतिसाद
स्लिक कंपनी तर्फे ग्लॅमर फॅशन क्वीन सीजन १ संचालक ज्ञानेश्वर चव्हाण ऑर्गनायझर तन्वी मुळे आणि काजल कोरडे यांच्या सहकार्याने सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा चिंचवड पुणे येथील एलप्रो सिटी स्क्वेअर मॉल मध्ये पार पडली. आंबेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह भ प शंकर बाबुराव मुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सुधीर घाडगे व ज्ञानेश्वर त्रिंबक ग्रेस फिटनेस आणि ग्रेस वाय-फाय चे मालक त्याचबरोबर इमरान शेख नॅशनल डायरेक्टर ऑफ इंडिया/अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी या शो ला स्पॉन्सर केले होते. या सौंदर्य स्पर्धेमध्ये 45 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात जम्मू-काश्मीर, राजस्थान, बेंगलोर व पंजाब तसेच विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्याच बरोबर सेलिब्रिटी डिझायनर शितल पाटील, रूपल डिझाईनिंग साक्षी कणसे आणि मेकअप आर्टिस्ट सारिका अरगडे यांनी स्पर्धकांचे सौंदर्य खुलवले.
तसेच युवांश फॅशनचे मालक मनीष मुथा चीफ गेस्ट म्हणून उपस्थित होते सोबतच ॲक्टर मॉडेल, डायरेक्टर जगदीशचंद्र देसले, शिवराय मासिकचे डायरेक्टर सचिन गवळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स मॅजेस्टिक हॉटेलचे मालक अंकित पाटील यांची मोलाची उपस्थिती ठरली. कार्यक्रमासाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी कॅमेरामन प्रतिक वाघ यांनी केली होती. अँकर म्हणून निलेश पापड यांनी चांगली जबाबदारी पार पाडली.
मीनाक्षी पाटील व कावेरी कांबळे या सपोर्टिंग पार्टनर्स होत्या. सौ रूपाली मुळे व श्री संतोष मुळे यांनी विशेष योगदान दिले. अक्षय दरवडे यांनी उत्तमरीत्या शो कोरिओग्राफी करून शो ची शोभा वाढवली.
किड्स कॅटेगिरी मध्ये अदिशा पाटील मिस उमा बलोरिया (जन्मू कश्मिर) आणि मिसेस स्मृती गवळी या ग्लॅमर फॅशन क्वीन च्या विनर ठरल्या.
लवकरच फॅशन क्वीन सीजन 2 घेण्यात येईल असे संचालक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले