माजी आ.राजेंद्र नजरधने यांच्या मागणीला यश महागाव बस स्थानक होणार स्मार्ट ; सव्वा तीन कोटीची निविदा प्रसिद्ध
ब्युरो रिपोर्ट महागाव :
महागाव बस स्थानक नव्याने उभारणीसाठी तब्बल सव्वातीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीसाठी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.त्यांच्या मागणीला यश आले असून बस स्थानक उभारणीसाठी सव्वा तीन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच बसस्थानक उभारणीसाठी निविदा सुध्दा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये अत्याधुनिक सुविधेसह बस स्थानक दुमाजली करण्यात येणार आहे.
बस स्थानक उभारणीकरिता नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामध्ये प्रवाश्यांना बसण्याकरिता नवीन २ फलाट वाढविण्यात येणार असून फलाट संख्या आता ९ होणार आहे.मुक्कामी असणाऱ्या बस चालक आणि वाहक यांना आराम करण्याकरिता बस स्थानकाच्या वर आरामदायी रेस्ट रूम बांधण्यात येणार आहे.वाहतूक नियंत्रक कक्षासह प्रवाश्याकरिता नवीन सुलभ शौचालय करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या नवीन बसस्थानक उभारणीमुळे महागाव बस स्थानक आता स्मार्ट होणार असून प्रवाश्यांची गैरसोय थांबणार आहे.