महागांव पोलिसांची कारवाई – घर फोडी करणाऱ्या चोरट्यांना पाच तासात अटक
महागांव पोलिसांची कारवाई -घर फोडी करणाऱ्या चोरट्यांना पाच तासात अटक
पोलिसांकडून चार आरोपी जेरबंद; ०१लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महागाव शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यां च्या महागाव पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. गुरुवारी तारीख( ०१फेब्रुवारी )रोजी महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये अल्ताफ मुख्तार शेख हे आपल्या नातेवाईक यांच्या लग्नाकरिता घराला कुलूप लावून गेले असता रात्री ११:००ते १२:०० वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व चांदी असा एकूण ०२लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार महागाव पोलीस स्टेशनला दिली होती. यावरून पोलीस स्टेशन अपराध क्रमांक ४५७ ,३८० भां.द.वी. कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी त्यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून रवाना केले .सदर आरोपी ची माहिती घेत असताना पोलिसांनी गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळवली कि घटनेच्या रात्री आकाश पवार नावाचा मुलगा सदर आठवडी बाजार परिसर प्रभागात संशयित्रीच्या फिरत होता .त्यावरून पोलिसांनी संशयीत आकाश पवार यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्याने आरोपीने होण्याची कबुली दिली की तो व त्याचे साथीदार गिरीश गाडे ,प्रवीण नारायण सुरोशे, सय्यद अजहर सय्यद युनुस सर्व राहणार महागाव यांचा चोरीत समावेश असल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी तत्काळ इतर आरोपी ताबडतोब ताब्यात घेऊन विचार पूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम ०१ लाख ४०हजार रुपये व चांदी ६हजार रुपये असा एकूण१ लाख ४६ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड ,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस ठाणेदार सोमनाथ जाधव ,सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे ,केशव पुजरवाड, पोलीस निरीक्षक सागर अण्णावार, जमादार सुहास कायटे, त्यांनी केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव पुजरवाड व विष्णू कायटे करीत आहेत ब्युरो रीर्पोट मराठी नाईन न्युज महागाव