क्राइम
तलाठी कार्यालय जाळून साहित्य लंपास,दस्तावेज जाळण्यामागचे रहस्य काय?

तलाठी कार्यालय जाळून साहित्य लंपास,दस्तावेज जाळण्यामागचे रहस्य काय ?
फुलसावंगी जि.यवतमाळ दि. २ : येथील तलाठी कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने कार्यालयातील महत्वाचे दस्तावेज जाळले. तसेच चार खुर्च्या नेल्या. ही घटना मंगळवारी (दि. १ एप्रिल) सकाळी उघडकीस आली असून, पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. तलाठी एम. एम. शेख यांना मंगळवारी सकाळी कार्यालयाच्या दाराचे कुलूप तुटलेले आढळले. आत जाऊन पाहिले असता, लोखंडी कपाट फोडून त्यातील महत्वाच्या कागदपत्रांची जाळपोळ केल्याचे व कार्यालयातील चार खुर्च्या चोरीला गेल्याचे दिसून आले. तलाठी शेख यांनी तातडीने महागाव तहसीलदारांना माहिती देऊन महागाव पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्याची माहिती आहे, नेमकी कोणती कागदपत्रे जाळण्यात आली. याचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.