राजकियराज्य

जनता प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या पाठीशी आहे…!जनतेचा विकासावर विश्वास कायम – रामदास पाटील सुमठाणकर

जनता प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या च्या पाठीशी आहे..!लोकांचा विकासावर विश्वास कायम- रामदास पाटील सुमठाणकर 

 

 ब्युरो रिपोर्ट हिंगोली :- नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली याचं सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं म्हणावं लागेल.

देशात मागील दहा वर्षात झालेल्या अनेक लोकाभिमुख योजनेतून मोदी सरकारने जनतेला आपलंस केल्यानं आणि अनेक कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू असल्याने जनतेचा विश्र्वास कमावण्यात भाजप यशस्वी झाले आहे.हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींप्रती लोकभावनांचे प्रतिबिंब असून आजचा विजय हा २०२४ च्या लोकसभा निवडणुक विजयाची ही नांदी ठरणारा आहे.

2014 साली देशात मोदीजींची सत्ता आल्यानंतर अनेक महत्वाच्या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर केले. त्याच फळं आज अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या रूपानं दिसून येत आहे.

आजचे विजय हे गरीब आणि शेतकऱ्यासाठी काम केल्याचं फलित आहे.आज मतदारांचा विश्र्वास कायम राखत भाजपाने मुसंडी मारलीय.आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळणारं यांची जाणीव करून देणारा हा निकाल आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी केलेल्या कामाचं महत्त्व लक्षात घेऊन जनतेनं भाजपाच्या बाजूने कौल दिला. लोकांच्या मनात मोदी जी अजून कायम असून त्यांचा करिश्मा अजून कायम असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

पुढे पाटील म्हणतात,

विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढवण्यात आली हाच कल लोकसभा निवडणुकीतही कायम राहील असा विश्वास वाटतो.

देशातील जनतेने या निवडणुकांमधून आपला मूड दाखवून दिला आहे. विशेषतः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपला मोठे यश मिळाले आहे.मोदींच्या नेतृत्त्वात आमच्या सरकारने जी रणनिती ठरवली होती,त्यास जनतेने एकप्रकारे समर्थन देत पाठिंबा दिला आहे.

देशाला महासत्ता बनविण्यासाठी आणखी वेगाने विकास करण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्यासाठी जनता पाठीशी आहे.याची जाणीव या निमित्ताने होत आहे.जनतेचा हा पाठिंबा देशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.आणि देशाला एक बलशाली राष्ट्र बनवेल.

आजचा विजय हा जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दूरदृष्टीवर दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे असे रामदास पाटील म्हणाले.

  • तसेच आगामी 2024 ला हिंगोली लोकसभा भाजपा विक्रमी मताने जिंकणार असेही ते म्हणाले.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close