हिंगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते मल्लिकार्जुन खरगे,सोनिया गांधी,राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सोबतच – ॲड.सचिन नाईक
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते मल्लिकार्जुन खरगे,सोनिया गांधी,राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सोबतच- ॲड.सचिन नाईक
( ब्युरो रिपोर्ट हिंगोली )
आरएसएस-भारतीय जनता पार्टीच्या अभियान कमळ (ऑपरेशन लोट्सला) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे काही दिग्गज नेते बळी पडत असून मराठवाडा विभागात पार्टीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमात होत आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ही कुण्या एका व्यक्तीच्या नावाने चालत नाही तर राष्ट्रपिता महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,शहीद भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,सरदार वल्लभभाई पटेल,इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्या विचारांवर चालणारी पार्टी आहे. आरएसएस -भारतीय जनता पार्टीच्या धर्मांध-जातीयवादी हुकूमशाही विरुद्ध लढण्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व जनता आणि काँग्रेस पार्टीचे शिलेदार तयार आहेत,म्हणून मराठवाड्यातील कितीही मोठ्या नेत्यांनी काँग्रेस पार्टी संपविण्याचे षडयंत्र रचले तरी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.मल्लिकार्जुन खरगे,मा.खा.सोनियाजी गांधी,मा.खा. राहुलजी गांधी,मा.खा.प्रियंका गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरएसएस-भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार २०२४ मध्ये पाडण्यासाठी रात्रंदिवस संघर्ष करणार आहेत असे काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी ॲड.सचिन नाईक यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.