माजलगाव येथील पाच वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या
ब्युरो रिपोर्ट नांदेड :-
माजलगाव येथील अल्पवयीन पाच वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी नांदेड येथील सराफा व्यापारी यांच्याकडून करण्यात आली आहे
माजलगाव येथील सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेड येथे एकदिवसीय सराफा बाजारपेठ बंद ठेवून माननीय जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले यावेळेस नांदेड महानगर वृत्तपत्राचे संपादक भानुदास लोळगे यांच्यासह
सराफा असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राव बोधने अजय डहाळे दुर्गेश बागडे आणि आणि मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज नांदेड