
डॉ. तक्षशिला हरगोविंद मोटघरे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेत समिती सदस्य म्हणून निवड
यवतमाळ ब्युरो रिपोर्ट :-
महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, यवतमाळच्या कर्तृत्ववान आणि दूरदृष्टीसंपन्न प्राध्यापिका डॉ. तक्षशिला हरगोविंद मोटघरे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत आंतरविद्या शाखा सदस्य (Faculty Committee Member) म्हणून नुकतीच निवड झाली असून, या निवडीमुळे महाविद्यालयात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ऊर्जा संचारली आहे.
शिक्षण, लिखाण आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रात आपली असामान्य क्षमता सिद्ध करणाऱ्या डॉ. मोटघरे यांचा हा सन्मान त्यांच्या कठोर परिश्रम, व्यासंग आणि मूल्यनिष्ठ वृत्तीचा गौरवच म्हणावा लागेल. शैक्षणिक गुणवत्ता आणि समाजभान यांचा सुंदर संगम असलेली त्यांची वाटचाल, नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे.
या गौरवाच्या क्षणी महाविद्यालयाचे संस्थापक श्री दिनेश सवाई ,प्राचार्य डॉ. सुनील वाशिमकर, श्री. पवन ठाकरे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी डॉ. मोटघरे यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक केले.
याचप्रमाणे, त्यांच्या यशात मोलाचा वाटा असलेले त्यांचे पती श्री. निलेश चहांदे यांच्यासह मोटघरे परिवाराने दिलेल्या प्रेमळ शुभेच्छांनी या क्षणास अधिकच भावनिक आणि सन्मान्य परिमाण प्राप्त झाले.
यश ही केवळ पदवी नसून, समाजाच्या समवेत घेतलेली मूल्याधिष्ठित वाटचाल असते, याचे मूर्त स्वरूप म्हणजे डॉ. तक्षशिला हरगोविंद मोटघरे. त्यांची ही निवड विद्यार्थ्यांना आंतरशाखीय अभ्यास, समन्वयी विचार आणि मूल्याधारित शिक्षणाच्या दिशेने प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास महाविद्यालयातून व्यक्त होत आहे.